Posts

रोज एक पान_७_संकल्प

Image
      Image Courtesy: Pixabay            नमस्कार, आज खूप दिवसांनी हे पान लिहायला घेतले... माझ्या 'रोज एक पान' ह्या सदराची संकल्पना वाचली असेल तर तुमच्याही लक्षात आलं असेल की छोट्या छोट्या कित्येक गोष्टी ह्या सदरातून उलगडण्याचा माझा प्रयत्न असतो... हाच 'प्रयत्न' आजच्या पानाचा विषय असला पाहिजे असं ह्या नवीन वर्षात आल्यावर मनापासून जाणवतंय...             सालाबादप्रमाणे ह्या वर्षाच्या स्वागतालाही प्रत्येकानेच आपापल्या मनाप्रमाणे तयारी केली असेल. त्याच उत्साहात नवीन वर्ष सुरू झालेले आहे.... पण आज केवळ आठवड्यानंतर एक गोष्ट किती जणांनी खरोखर लक्षात ठेवली आहे? ती म्हणजे नववर्षाच्या फक्त पहिल्या दिवशी आवर्जून एका गोष्टीची प्रत्येकाला आठवण असते आणि एकमेकांना त्या विषयी प्रश्न ही विचारला जातो... अन् तो म्हणजे "ह्या वर्षीचा संकल्प काय आहे ?"...काय खरं आहे ना? तुम्हाला कोणी किंवा तुम्ही कोणाला तरी हे विचारलं असेलच...             तुम्ही काय संकल्प केला ? मी काय केला ह्या विषयी मला काही चर्चा कराय...

रोज एक पान_६_लाडूवरचा बेदाणा आणि प्राजक्त

Image
                     कधी कधी आपल्याला अशी काही माणसं भेटतात की जे कायम इतरांपासून प्रेरित होत असतात आणि तेच इतरांनाही प्रेरित करत असतात. ह्यामुळेच जीवनाचा खरा अर्थ उलगडता येतो.  खरंच प्रत्येकाच्या संपर्कात अशी मंडळी असावीच.        स्वतः साठी सगळेच जगतात; परंतू इतरांसाठी जगूनही 'आनंद' शोधण्यासोबत तो वाटण्यात खरी माणुसकी जपणारे अनेक हात आपल्या देशात आहे. समाजात जगताना समाजाप्रती काही कार्य केले पाहिजे हे आपण लहापणापासून शिकत असतो, ऐकत असतो. पण तरी सुद्धा खऱ्या आयुष्यात ही गोष्ट कायम जपणारे काहीच लोक असतात. समाजकल्याणासाठी आपलं आयुष्य वाहिलेल्या अनेक नामवंत, थोर व्यक्तींबद्दल आपण सारेच जाणतो.  अगदी तसेच समाजात काही अशाही वल्ली आहेत ज्या त्यांच्या इतपत जमलं नाही तरी आपापल्या परीने समाजाचं देणं फेडण्याचं काम कायमच करत असतात. अशाच एका गटाशी ४/५ वर्षांपूर्वी संपर्कात आलो. 'Joy of Giving' उपक्रमांतर्गत दिवाळीच्या निमित्ताने काही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथल्या रहिवाश्यांना दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू दे...

रोज एक पान_५_तीन कटींग

Image
PC : Google ए छोटू, दोन कटींग दे रे....ए आई गं, खूप दमलोय. चहा दे ना....चला, जरा कटींग ब्रेक घेऊ...असं म्हणत किती वेळा दिवसातून कटींग घेता??  आता म्हणाल चहा कोणी मोजत का?  बरं नका मोजू...  आपल्यातल्या कित्येकांना दिवसातून बऱ्याच वेळा चहा प्यायची इतकी सवय लागलेली असते की, त्याशिवाय त्यांची कामं होत नाहीत.... कारण काही असो पण जरा आठवा आणि बघा दिवसातून किती चहा पिता.. काहींना पूर्ण कप नसला तरी चालेल पण कटींग तर हवाच... दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे कटींग... कटींग म्हणजे काय हे खरंतर कुणाला सांगायची गरज नाहीच... पण आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने तरी झाडांना कटींग देत आहात की नाही ? झाडांचं कटींग केलं(छाटणी केली) म्हणायचं आहे का ? तर अजिबातच नाही.. कटींग देताय का हेच विचारायचं आहे... हो तर का नाही... पर्यावरण ? कटींग ? काय संबंध ?  असेच प्रश्न मनात आले असतील...सगळं सांगते फक्त अट एवढीच की आपण ज्या पर्यावरणामुळे निरोगी आयष्य जगू शकतो त्याचं रक्षण करणं, त्या साठी पुढाकार घेणं ह्या साठी "वेळ मिळत नाही " अशा सबबी सांगणं बंद करा आणि बाकी काही विशेष केलं नाह...

रोज एक पान_४_ट्रेक आणि विटॅमिन सी

Image
        कसे आहात सगळे? हो मी पण पूर्ण ठणठणीत आहे. तुम्हीही विचाराल म्हणून मीच सांगितलं... सदराचं नाव जरी 'रोज एक पान' असलं तरी काही कारणांमुळे अर्धवट राहीलेली पानं पूर्ण करायला जमलं नाही... पण आता अगदीच रोज नाही पण फार वेळ न घेता पुढील पानं घेऊन यायचा नक्कीच प्रयत्न राहील. ..        बऱ्याच दिवसांपासून नक्की काय आणि कशावर लिहावं हेच नेमकं ठरत नव्हतं.. म्हणून काही अर्धवट लिहून झालेल्या पानांवरून नजर फिरवली अन आठवणीतलं हे गंमतीशीर पान पूर्ण करायचं ठरवलं...          बरं आधी हे सांगा विटॅमिनच्या गोळ्या आणि वेगवेगळे काढे घेत आहात की नाही? की नव्याच्या नवलाईसाखं आता कोरोनाच्या बाबतीत घ्यायच्या खबरदारीचंही झालंय? रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून गेल्यावर्षीपासून  कित्येकांना ह्या सगळ्याची सवयच झाली आहे. खबरदारी नक्की घ्यावी पण त्याचा अतिरेक नको...   तुम्हालाही आता समुद्राच्या लाटेपेक्षा कोरोनाच्या लाटांच्या बातम्या ऐकण्याची सवय झालीच असेल ना. म्हणून फक्त विचारलं.... असो कोरोना आणि खबरदारी हा आजचा विषय नक्कीच नाही.....

रोज एक पान_३_अनोळखी नाती

Image
     नातं /नातेवाईक म्हणजे खूपच गुंतागुंत... नात्यांबद्दल काय बोलणार ? म्हटलं तर खूप नाही तर काहीच नाही...   नातं मग ते कोणतेही असो; कधी ते रक्ताचे असते तर कधी ते आपुलकीने जोडलेले असते.. . आता म्हणाल तरी नक्की कुठल्या नात्याविषयी बोलत आहे? असं ह्याबद्दल काय आणि सांगणार तरी किती? तसं बघायला गेलं तर खरंच ह्या विषयावर फार काही बोलण्यासारखं नाही..तरी जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात रुळलेली नात्यांची एक गंमत म्हणून आज हे वेगळं पान लिहिण्याचा हा प्रयत्न... कुणी तरी म्हटलं आहे नाती समजायची नसतात; ती मानायची असतात...तर मग नातं अनोळखी कसं असेल.. मी म्हणते का नाही? आता हेच बघा.. आई- वडील आणि मूल, काका- काकी, मामा- मामी, मावशी, आत्या, आजी- आजोबा...ही सर्व ओळखीतली नाती असतात...तर अशी एक ना अनेक नाती सांगता येतील...दुसऱ्या बाजूने बघायचं तर नातं म्हणजे अशी ओळख जिथे फक्त रक्ताची नाती किंवा व्यक्तींची नावं पुरेशी नसून त्या व्यक्तीची वागणूक, कार्य, व्यवसाय आणि अशा किती तरी व्यक्तीला संबोधित करणाऱ्या गोष्टी.... पण ही ओळख अनोळखी असेल तर ??? तरी सुद्धा असे कित्येक नातेवाईक सापडतील हो...

रोज एक पान_२_मोगरा फुलला...

Image
                        काय मग, मागच्या पानातला बकुळगंध मनात दरवळला की नाही ? म्हणजे तुम्हांलाही अशी एखादी मनी रुजलेली आठवण आली का? आली असेल तर ती आणखी जपून ठेवा... आता आजचं शीर्षक वाचून वाटलंच असेल की आता मी नेहमी एक एक फूलांच्या आठवणी सांगायच्या असं ठरवलं की काय... तर तसं नाही.. खरं तर ह्या पुढचं पान हे वेगळ्या विषयावर लिहायचं ठरवलं होतं आणि ते पान जवळपास भरतही आलं होतं...           पण कधी कधी अचानक आलेलं वेगळं वळणही खूप आनंदाचं असतं आणि म्हणूनच चालू असलेलं पान जरा बाजूला ठेवून एक अधिकचं पान लिहायला तर हवचं... तेव्हा आजचं हे गोंडस पानही आवडलं तर जपून ठेवा...                अगदी लहानपणापासून म्हणा किंवा समजायला लागल्यापासून म्हणा; प्रत्येक जण आपापल्या आवडी वेगवेगळ्या पध्दतीने जमेल तसा जपत असतोच आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे 'मोगरा' असं मला वाटतं... अर्थात संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगात फुललेल्या मोगऱ्याचं जसं आणि जे वर्णन केले आहे ते पुन्हां एकदा शां...

रोज एक पान_१_"बकुळगंध......"

Image
              सकाळी लवकर  नेहमीप्रमाणे तिला जाग आली. ती अर्थात भ्रमणध्वनीच्या गजरामुळे... उठता क्षणी तिची नजर सवयीने तिच्या आवडत्या जागी गेली.. तिची हक्काची, शांतता आणि आनंद देणारी अशी जागा तिने खूप छान सजवली होती.   वेगवेगळ्या फुलांची  अन्  वेलींची रोपटी ह्यांनी सजलेला तो कोपरा खूपच तजेलदार होता.. ताज्या टवटवीत नुकत्याच उमलू लागलेल्या विविध फुलांचा सुगंध... रातराणीचा अजूनही दरवळणारा मंद दरवळ...  फुलांवर भिरभिरणारे मोहक फुलपाखरू, चिमणीपाखरांचा चिवचिवाट... दिवसाची सुरुवात करून देणारे रवीकिरण..  अन्   नभोवनात सुरु असलेला तो ऊन सावल्यांचा खेळ... रोज दिवसाची सुरुवात ह्याच तिच्या आवडत्या जागी  करायची हे तिने ठरवलेच होते.                 उठल्यावर   रोजच्याप्रमाणे आधी तिने तिच्या ह्या सर्व रोपट्यांना पाणी दिले आणि कायम तिला निर्व्याज, अमूल्य आनंद देतात म्हणून  मनोमन त्यांचे आभार मानले... पाणी पिऊन तृप्त झालेल्या त्या हिरव्यागार रोपट्यांचा तजेला, मातीचा आणि फूलांचा त...