रोज एक पान_५_तीन कटींग
PC : Google ए छोटू, दोन कटींग दे रे....ए आई गं, खूप दमलोय. चहा दे ना....चला, जरा कटींग ब्रेक घेऊ...असं म्हणत किती वेळा दिवसातून कटींग घेता?? आता म्हणाल चहा कोणी मोजत का? बरं नका मोजू... आपल्यातल्या कित्येकांना दिवसातून बऱ्याच वेळा चहा प्यायची इतकी सवय लागलेली असते की, त्याशिवाय त्यांची कामं होत नाहीत.... कारण काही असो पण जरा आठवा आणि बघा दिवसातून किती चहा पिता.. काहींना पूर्ण कप नसला तरी चालेल पण कटींग तर हवाच... दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे कटींग... कटींग म्हणजे काय हे खरंतर कुणाला सांगायची गरज नाहीच... पण आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने तरी झाडांना कटींग देत आहात की नाही ? झाडांचं कटींग केलं(छाटणी केली) म्हणायचं आहे का ? तर अजिबातच नाही.. कटींग देताय का हेच विचारायचं आहे... हो तर का नाही... पर्यावरण ? कटींग ? काय संबंध ? असेच प्रश्न मनात आले असतील...सगळं सांगते फक्त अट एवढीच की आपण ज्या पर्यावरणामुळे निरोगी आयष्य जगू शकतो त्याचं रक्षण करणं, त्या साठी पुढाकार घेणं ह्या साठी "वेळ मिळत नाही " अशा सबबी सांगणं बंद करा आणि बाकी काही विशेष केलं नाह...