रोज एक पान_३_अनोळखी नाती
नातं /नातेवाईक म्हणजे खूपच गुंतागुंत... नात्यांबद्दल काय बोलणार ? म्हटलं तर खूप नाही तर काहीच नाही... नातं मग ते कोणतेही असो; कधी ते रक्ताचे असते तर कधी ते आपुलकीने जोडलेले असते.. . आता म्हणाल तरी नक्की कुठल्या नात्याविषयी बोलत आहे? असं ह्याबद्दल काय आणि सांगणार तरी किती? तसं बघायला गेलं तर खरंच ह्या विषयावर फार काही बोलण्यासारखं नाही..तरी जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात रुळलेली नात्यांची एक गंमत म्हणून आज हे वेगळं पान लिहिण्याचा हा प्रयत्न... कुणी तरी म्हटलं आहे नाती समजायची नसतात; ती मानायची असतात...तर मग नातं अनोळखी कसं असेल.. मी म्हणते का नाही? आता हेच बघा.. आई- वडील आणि मूल, काका- काकी, मामा- मामी, मावशी, आत्या, आजी- आजोबा...ही सर्व ओळखीतली नाती असतात...तर अशी एक ना अनेक नाती सांगता येतील...दुसऱ्या बाजूने बघायचं तर नातं म्हणजे अशी ओळख जिथे फक्त रक्ताची नाती किंवा व्यक्तींची नावं पुरेशी नसून त्या व्यक्तीची वागणूक, कार्य, व्यवसाय आणि अशा किती तरी व्यक्तीला संबोधित करणाऱ्या गोष्टी.... पण ही ओळख अनोळखी असेल तर ??? तरी सुद्धा असे कित्येक नातेवाईक सापडतील हो...