रोज एक पान_२_मोगरा फुलला...
काय मग, मागच्या पानातला बकुळगंध मनात दरवळला की नाही ? म्हणजे तुम्हांलाही अशी एखादी मनी रुजलेली आठवण आली का? आली असेल तर ती आणखी जपून ठेवा... आता आजचं शीर्षक वाचून वाटलंच असेल की आता मी नेहमी एक एक फूलांच्या आठवणी सांगायच्या असं ठरवलं की काय... तर तसं नाही.. खरं तर ह्या पुढचं पान हे वेगळ्या विषयावर लिहायचं ठरवलं होतं आणि ते पान जवळपास भरतही आलं होतं... पण कधी कधी अचानक आलेलं वेगळं वळणही खूप आनंदाचं असतं आणि म्हणूनच चालू असलेलं पान जरा बाजूला ठेवून एक अधिकचं पान लिहायला तर हवचं... तेव्हा आजचं हे गोंडस पानही आवडलं तर जपून ठेवा... अगदी लहानपणापासून म्हणा किंवा समजायला लागल्यापासून म्हणा; प्रत्येक जण आपापल्या आवडी वेगवेगळ्या पध्दतीने जमेल तसा जपत असतोच आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे 'मोगरा' असं मला वाटतं... अर्थात संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगात फुललेल्या मोगऱ्याचं जसं आणि जे वर्णन केले आहे ते पुन्हां एकदा शां...